Loading...
Loading...

ग्रामपंचायत खार्डी–डोलिव ही वसई तालुक्याच्या पूर्व भागात स्थित असलेली ग्रामीण स्वराज्य संस्था असून तिची स्थापना १७ एप्रिल २०१२ रोजी झाली. खार्डी आणि डोलिव ही दोन महसुली गावे या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,९८३ आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात आगरी व कोळी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून कातकरी व वारली समाज देखील अल्प प्रमाणात आढळतो.
खार्डी गावाच्या पूर्वेस डोंगर, पश्चिमेस खाडी, दक्षिणेस कोशिंबे व उत्तरेस तानसा नदी अशी नैसर्गिक सीमा आहे. जिल्हा मुख्यालयापासूनचे अंतर अंदाजे ५६ किमी आहे.
आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांत ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणीहेच ग्रामपंचायतीचे प्रमुख ध्येय आहे.
सर्वसमावेशक विकास, पारदर्शक प्रशासन व ग्रामस्थांचा सहभाग यांच्या आधारावर खार्डी व डोलिव ही गावे प्रगत आणि सशक्त करण्यासाठी ग्रामपंचायत सातत्याने प्रयत्नशील आहे.

सरपंच, ग्रामपंचायत खर्दी डोळीव
गावाचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक प्रशासन ठेवण्याच्या ध्येयाने कार्यरत.

ग्रामविकास अधिकारी
योजना अंमलबजावणी, नागरिकांचा सहभाग व शाश्वत विकास यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न.

ग्रामात स्वच्छता राखणे आणि हिरवेगार परिसर तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

ग्रामातील शाळा आणि इतर शैक्षणिक सुविधांची माहिती येथे उपलब्ध आहे.

ग्रामातील आरोग्य केंद्रे, हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा यांची माहिती.